श्रावण महिना संपातला आणि चिकन, मटण आणि माश्यांच्या दरामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून आले. श्रावण महिन्यामध्ये अनेक जण मासांहार करणं टाळतात. त्यामुळे चिकन, मटण आणि माश्यांचे दर कमी झाले होते. पण आता श्रावण महिना संपला त्यानंतर आता खवय्यांनी मटन, चिकनच्या दुकानावर
मोठी गर्दी केली आहे. चिकन, मटणच्या दरामध्ये नेमकी किती रुपयांनी वाढ झाली
हे जाणून घेऊ..
मिळालेल्या माहितीनुसार, पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्याने आज नागपूरात लाखो रुपयांची मटण, चिकनची विक्री होणार असून श्रावण महिना संपल्याने पोळ्याचा पाडवा मांसाहार प्रेमींसाठी पर्वणीच असतो. शहरातील विविध मटण मार्केटमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे. मटण-चिकनच्या शॉपबाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाडव्याच्या निमित्ताने हैद्राबाद, मध्यप्रदेशातून बोकड आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
बाजारात मोठी उलाढाल..
मटण, चिकन विक्रीने आज नागपूरच्या बाजारात मोठी उलाढाल होणार असून आज मटण 750 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. गावरण कोंबडी 700 रुपये प्रति किलो तर बॉयलर, कोक्रेल कोंबडी 220 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. श्रावण संपल्यानंतर आता मटण, चिकनच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.