Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्याही लघवीमधून फेस येतो का? जाणून घ्या कारणं आणि आयुर्वेदिक उपाय...

तुमच्याही लघवीमधून फेस येतो का? जाणून घ्या कारणं आणि आयुर्वेदिक उपाय...
 

लघवीचा रंग सामान्यपणे हलका पिवळा असतो. पण जर लघवीचा रंग गर्द पिवळा येत असेल आणि लघवी करताना त्यातून फेस येत असेल तर मग ही धोक्याची घंटा असू शकते.  बऱ्याच लोकांच्या लघवीमध्ये अनेक फेस येतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जेव्हा लघवीत फेस दिसतो तेव्हा त्याला क्लाउडी यूरिन असं म्हटलं जातं. सामान्यपणे लघवीमध्ये फेस येणे ब्लॅडर भरण्याचा संकेत आहे. या स्थितीत यूरिन तुमच्या ब्लॅडरवर हल्ला करते. पण यामागे आणखीही काही कारणे असू शकतात. चला जाणून घेऊ लघवीतून फेस येण्याचं कारण काय आहे.

सामान्यपणे यूरिनचा स्पीड जास्त असल्याने फेस तयार होतो. पण जर लघवीत फेस जास्तच दिसत असेल आणि दिवसेंदिवस वाढत असेल तर हा एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. अशात तुमच्या लघवीत फेस दिसत असेल तर याच्या आणखीही काही लक्षणांवर लक्ष देण्याची गरज आहे.


लघवीतून फेस येण्याची लक्षणं...
- हात, पाय, चेहरा आणि पोटावर सूज, हे किडनी डॅमेज झाल्याचे संकेत असू शकतात.

- थकवा भूक कमी लागणे

- मळमळ

- उलटी

- झोपेची समस्या

- लघवी कमी तयार होणे

- जर तुम्ही पुरूष असाल तर ऑर्गॅज्मवेळी सीमन फार कमी किंवा अजिबातच न येणे

- जर तुम्ही पुरूष असाल तर इंफर्टिलिटीची समस्या होणे

लघवीतून फेस येण्याची कारणं

जेव्हा तुम्ही बराच वेळ लघवी रोखून ठेवता आणि मग अचानक पास करता तेव्हा जास्त स्पीड असल्याने लघवीत फेस तयार होतो. पण हा फेस काही वेळातच क्लीअर होतो. अनेकदा लघवीत फेस तयार होण्याला यूरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असण्याकडे इशारा करतं. यूरिनमधील प्रोटीन हवेच्या संपर्कात आल्यावर फेस तयार होतो.

इतर कारणं

किडनी डिजीज

किडनीचं मुख्य काम ब्लडमधील प्रोटीन फिल्टर करणं असतं. प्रोटीन आपल्या शरीरात फ्लूइडला बॅलन्स करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. किडनी डॅमेज झाल्यावर किंवा किडनीसंबंधी काही आजार झाल्यावर हे प्रोटीन किडनीतून लीक होऊन यूरिनमध्ये मिक्स होतं. एल्बुमिन एकप्रकारचं प्रोटीन असतं जे आपल्या रक्तात असतं. जेव्हा तुमची किडनी योग्यप्रकारे काम करते तेव्हा किडनी या प्रोटीनला जास्त प्रमाणात तुमच्या लघवीत जाऊ देत नाही. 

डिहायड्रेशन

जर कुणाला डिहायड्रेशनची समस्या झाली तर त्यांच्या लघवीचा रंग डार्क दिसतो. असं पाण्याचं सेवन फार कमी प्रमाणात केल्याने होतं. पाण्याचं सेवन कमी केल्याने प्रोटीन यूरिनमध्ये डायल्यूट होत नाही. प्रोटीनमध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज असतात ज्यांनी यूरिन पास करताना फेस तयार होतो. जर हायड्रेटेड राहिल्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या लघवीत फेस येत असेल तर हे किडनी डिजीजचं लक्षण असू शकतं.

डायबिटीस

शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने किडनीत एल्बुमिन हाय लेव्हलमध्ये पास होतं. ज्यामुळे यूरिनमध्ये फेस दिसतो. टाइप 2 डायबिटीसच्या रूग्णांमध्ये खालील लक्षणे दिसतात.

- धुसर दिसणे

- तोंड कोरडं पडणे

- सतत तहान लागणे

- सतत लघवी लागणे
भूक लागणे

- त्वचेवर खाज येणे

आयुर्वेदिक उपाय

धण्याचं पाणी

धण्याचं पाणी सेवन केल्याने लघवीसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. लघवीतून फेस येणे किंवा जास्त वास येणे ही समस्या या पाण्याने दूर होते. या पाण्याच्या सेवनाने यूटीआयची समस्या दूर करण्यास मदत मिळते. धण्याचं पाणी तयार करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा धणे टाकून उकडून घ्या. त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर गाळून त्याचं सेवन करा. दिवसातून दोन वेळा या पाण्याचं सेवन करावं.

आल्याचं पाणी

आल्याचं पाणी पिऊनही तुम्ही लघवीतील दुर्गंधी आणि फेस दूर करू शकता. यासाठी अर्धा तुकडा आले घ्या आणि एक कप पाण्यात ते उकडा. पाणी कोमट झाल्यावर चहासारखं थोडं थोडं सेवन करा. या पाण्याने ब्लॅडर इन्फेक्शन, लघवीसंबंधी समस्या दूर होतात. 

ब्लूबेरी ज्यूस

लघवीमधून फेस किंवा दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ब्लूबेरीचा ज्यूस सेवन केला पाहिजे. यूटीआय इन्फेक्शन, लघवीतून वास, ब्लॅडरमधील इन्फेक्शन इत्यादी समस्या या ज्यूसने दूर होतात. एक कप ब्लूबेरी ज्यूस दिवसातून दोन वेळा सेवन करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.