Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लहानपणी समोसे विकणाऱ्या पाचवी पास मुलाने मुंबईत घेतला 6 कोटींचा फ्लॅट! कोण आहे तो?

लहानपणी समोसे विकणाऱ्या पाचवी पास मुलाने मुंबईत घेतला 6 कोटींचा फ्लॅट! कोण आहे तो?
 

लोकप्रिय स्टॅंड-अप कॉमेडियन आणि 'बिग बॉस 17' चा विनर मुनव्वर फारूकी गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या वादात अडकला आहे.

तर दुसरीकडे त्यानं मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं आहे. 'बिग बॉस 17' जिंकल्यानंतर तो यशाच्या शिखरावर हळू हळू जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आता त्याच्या नव्या अपार्टमेंटची चर्चा रंगली आहे. त्यानं हे घर वडाळाच्या न्यू कफ परेडमध्ये खरेदी केला आहे.

'ईटाइम्स'नं च्या रिपोर्टनुसार, मुनव्वर फारुकीच्या या नव्या अपार्टमेंटची किंमत ही 6.09 कोटी झालीये. याची माहिती स्क्वायर यार्ड्स' नं दिली आहे. मुनव्वरनं हा अपार्टमेंट एक हाय राइज बिल्डिंगमध्ये घेतला आहे. सध्या त्यानं घेतलेल्या या प्रॉपर्टीचं कंस्ट्रक्शन सुरु आहे. 'स्क्वायर यार्ड्स' ला जे डॉक्युमेंट्स मिळाले. त्यांच्याप्रमाणे अपार्टमेंट 1,767.92 स्क्वायर फूट परिसरात पसरलेला आहे. यात मुनव्वर फारुकीनं तीन पार्किंग स्पेस खरेदी केले आहेत.

मुनव्वर फारुकीनं या अपार्टमेंटचं रजिस्ट्रेशन 16 सप्टेंबर रोजी केलं. त्यासाठी त्यानं 30 हजार रुपयांसोबत 36.6 लाख रुपयातं स्टॅम्प ड्युटी भरली. ज्या बिल्डिंगमध्ये मुनव्वरला हे नवं अपार्टमेंटमध्ये, 3BHK आणि 4BHK आणि इतर सुविधा देखील आहेत.

मुनव्वर फारुकीच्या नेटवर्थविषयी बोलायचं झालं तर रिपोर्टनुसार, ही 8 कोटी रुपये आहे. स्टॅंडअप कॉमेडी, रिअॅलिटी शो, म्यूजिक व्हिडीओ, ब्रॅन्ड एन्डॉर्समेंट आणि यूट्युबवरून मुनव्वर पैसे कमावतो. 'बिग बॉस 17' जिंकल्यानंतर त्यानं 50 लाख रुपये जिंकले होते. असं म्हटलं जातं की बिग बॉस 17' मध्ये राहण्यासाठी त्याला रोजं 7-8 लाख रुपये मानधन मिळत होतं. जर त्यात त्याला मिळालेली प्राइज मनी घेतली तर संपूर्ण सीझनमध्ये त्यानं एकूण 1.7 कोटी कमावले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, मुनव्वर फारुकी एक स्टेज परफॉर्मेंस करण्यासाठी दीड ते अडीच लाख रुपये मानधन घेतो. तर इन्स्टाग्रामवर एक स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी तो 15 लाख रुपये घेतो. मुनव्वरचे लाखो चाहते आहेत. त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 14.1 कोटी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट सतत व्हायरल होत असतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.