Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छातीवर लाथ मारली, मग पॅन्ट काढली; पोलिसांकडून आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या बायकोसोबत नको तो प्रकार, 5 जण निलंबित

छातीवर लाथ मारली, मग पॅन्ट काढली; पोलिसांकडून आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या बायकोसोबत नको तो प्रकार, 5 जण निलंबित
 

ओडिसा : भुवनेश्वरमधून दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ज्यामध्ये एका लष्करी अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला. तर त्याच्या होणाऱ्या बायकोचा विनयभंग करण्यात आला होता. जेव्हा या प्रकरणी ते पोलिसात तक्रार करायला गेले, तेव्हा तक्रार न घेता पोलिसांनी या महिलेच्या छातीवर लाथ मारल्याचा आरोप देखील या महिलेनं केला आहे.

महिलेने आरोप केला की, "रात्री माझं रेस्टॉरंट बंद करुन १ च्या सुमारास निघोलो, तेव्हा रस्त्यात काही तरुणांनी तिची छेड काढली. त्यानंतर जेव्हा आम्ही एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलो, तेव्हा तिथे साध्या वेशातील एक महिला कॉन्स्टेबल होती. आम्ही तिला एफआयआर नोंदवण्यासाठी आणि बदमाशांना पकडण्यासाठी गस्तीचे वाहन पाठवण्यास सांगितले. मला मदत करण्याऐवजी त्यांनी गैरवर्तन केले." ही संपूर्ण घटना 15 सप्टेंबरला घडली.

अखेर 20 सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी या प्रकरणातील सात आरोपींना अटक केले. परंतू अटकेच्या ४ तासांनंतर त्या तरुणांना जामीन मिळाला. आरोपींना 20-21 सप्टेंबरच्या रात्री उशिरा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग-2 (JMFC) न्यायालयात हजर करण्यात आले, तेथे त्यांना जामीन मिळाला. अतिरिक्त डीसीपी कृष्ण प्रसाद दास यांनी सांगितले की, आरोपींचे 11 मोबाईल फोन आणि एक वाहन जप्त करण्यात आले आहे.
15 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास कार ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून या विद्यार्थ्यांनी दाम्पत्याशी गैरवर्तन आणि मारहाण केली होती. या दाम्पत्याने तक्रार घेऊन भरतपूर पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलिसांनी या लष्कर अधिकाऱ्याला लॉकअपमध्ये डांबून त्याच्या होणाऱ्या बायकोवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर लावला आहे.

पीडित महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ते तरुणांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा पोलिसांनी आधी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि नंतर लष्कराच्या अधिकाऱ्याला लॉकअपमध्ये डांबले. याला विरोध केला असता त्याला मारहाण करून हातपाय बांधण्यात आल्याचे पीडितेने सांगितले.

एका पुरुष अधिकाऱ्याने तिच्या छातीवर लाथ मारली. प्रभारी निरीक्षक जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पीडितेची पॅन्ट खाली खेचली, स्वत:चे प्रायव्हेट पार्ट दाखवले आणि अश्लील बोलले. यानंतर पोलिसांनी पीडितेलाच गैरवर्तनाच्या आरोपाखाली अटक केली.
19 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर डीजी वायबी खुरानिया यांच्या सूचनेनुसार चांडका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले, त्यानंतर भरतपूरच्या प्रभारी निरीक्षकासह 5 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.