Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

500 रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकारी जाळ्यात

500 रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकारी जाळ्यात
 

तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवर वाहनधारकांकडून महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक अमोल खैरनार यासह अन्य एका खासगी व्यक्तीला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२५) रात्री रंगेहाथ पकडले.

त्याच्या कार्यालयाच्या झाडाझडतीतून ६३ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी न्यायालयाने आरटीओ अधिकाऱ्यासह अन्य एकाला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महाराष्ट्र आणि तेलगंणा राज्याच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आरटीओ विभागाचे चेक पोस्ट कार्यान्वित आहे. दररोज शेकडोच्या संख्येने वाहनांची रेलचेल असते. महाराष्ट्र आणि तेलगंणा राज्यातून ट्रकची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. 

या मार्गावरून दररोज किती ट्रक जातात, ट्रकमध्ये किती माल आहे याचे वजन करून नोंदी करण्याचे काम चेक पोस्टमधील आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून केले जाते. अमोल धर्मा खैरनार या वाहन निरीक्षकाची २० सप्टेंबरपासून चेक पोस्टवर ड्युटी होती. ड्युटीदरम्यान खैरनर हा खासगी व्यक्ती गोपाळ इंगळे याच्यामार्फत ट्रकचालकाकडून पैसे वसूल करायचा.

अमरावतीच्या एका ट्रकचालकाकडे पाचशे रुपयांची मागणी केली. त्याने याची तक्रार अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. अमरावतीचे पथक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या देगलूर चेकनाक्यावर बुधवारी (ता.२५) पोचले. या पथकाने ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरोपी आरटीओ अमोल खैरनार व खासगी व्यक्ती गोपाळ इंगळे यास रंगेहाथ पकडले. त्याच्या कार्यालयात तपासणी केली असता ६३ हजार ८२० रुपयांची रक्कम सापडली. देगलूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.