Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अडीचशे कोटींची मालमत्ता 29 कोटींमध्ये विकण्याचा आमदार विनय कोरेंचा घाट; सत्यजित पाटलांची ईडीकडे तक्रार!

अडीचशे कोटींची मालमत्ता 29 कोटींमध्ये विकण्याचा आमदार विनय कोरेंचा घाट; सत्यजित पाटलांची ईडीकडे तक्रार!
 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी वारणा डेअरी अँड अॅग्रो इंडस्ट्री या कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी केला आहे.

सत्यजित पाटील सरुडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार विनय कोरे यांच्यावर गंभीर आरोप केले. सत्यजित पाटील यांनी कोरे यांची चौकशी करण्यासाठी थेट ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. पाटील यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे सुद्धा विनय कोरे यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. कोरे यांनी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची मालमत्ता केवळ 29 कोटी मध्ये विकण्याचा कोरे यांचा घाट असल्याचा दावा सत्यजित पाटील यांनी केला आहे.

सत्यजित पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट!
दरम्यान, शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर दौऱ्यात भेट घेतली होती.दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सरूडकर यांना राजकीय मोर्चेबांधणीबाबत सूचना दिल्या होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांचा महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विद्यमान आमदार विनय कोरे यांच्याशी पुन्हा एकदा मुकाबला होणार आहे.

आधी विनय कोरेंनी सरुडकरांविरुद्ध दोनदा विजय मिळवला असून सरुडकर कोरेंविरुद्ध एकदा विजयी झाले आहेत. आगामी विधानसभेला या आजी-माजी आमदारांमध्ये चौथ्यांदा लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही उमेदवार शह-काटशह देत जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला दिसत आहे. यादृष्टीने सरुडकरांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सरुडकर यांनी सांगितल्यानंतर मदतीचे आश्वासन शरद पवार यांनी सरुडकरांना दिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.