Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईत हिट अ‍ॅंड रन थांबेना! मालाडमध्ये 27 वर्षीय महिलेचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू; आरोपीस अटक

मुंबईत हिट अ‍ॅंड रन थांबेना! मालाडमध्ये 27 वर्षीय महिलेचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू; आरोपीस अटक
 

मालाड (मुंबई) : मुंबईत पुन्हा एकदा हिट अ‍ॅंड रनची घटना घडली आहे. भरधाव गाडीच्या धक्क्याने पुन्हा एक भीषण अपघात मुंबई मध्ये झाला आहे. 27 वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे. शहाना काझी असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव अनुज सिंह असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहाना काझी या मेहंदीचा क्लास घेऊन आपल्या घराकडे जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या फोर्ड कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर महिला काही अंतर कारसोबत फरफटत गेली आणि तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 281,285,105 आणि 184,185 कलम अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.