Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपमधील 24 नेते अस्वस्थ, 4 पक्ष सोडण्याच्या तयारीत; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने खळबळ

भाजपमधील 24 नेते अस्वस्थ, 4 पक्ष सोडण्याच्या तयारीत; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने खळबळ
 

मुंबई - आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी कोणाला द्यायची कोणती जागा कोणता पक्ष लढवेल याबाबत सत्ताधारी महायुतीसह विरोधक महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी घडत आहेत.

प्रत्येकवेळी जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा अनेक नेते उमेदवारी न मिळण्याची चाहूल लागताच दुसऱ्या पक्षात उड्या घेतात. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये 24 नेते अस्वस्थ असून त्यातील चार ते पाच जण लवकरच पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे सुतोवाच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यानंतर अनेक मतदारसंघांतील राजकीय चित्र बदलले आहे. कोल्हापूरच्या कागल मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ करतात. त्यांच्यामुळे सरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नेत्यांच्या या भाजपसोडीविषयी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपकडे 24 नेते असे आहेत जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीने आव्हान देऊ शकतात. पण आता या 24 जणांना आपल्या राजकीय वाटचालीची चिंता वाटत आहे. यामुळे पक्षात थोडी अस्वस्थता आहे. यापैकी 4-5 जण शरद पवार यांच्या पक्षात जातील. पण तिथे गेल्यानंतरही तुतारी लावणारे अनेकजण आहेत.

समरजितसिंहांना थांबायचे नव्हते –

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजप प्रत्येकाशी संवाद साधत आहे. आमची समरजितसिंह घाटगे यांच्याशीही चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील यांच्याशी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा चर्चा केली. समरजितसिंहांना थांबायचे नव्हते. कारण, त्यांना कोणत्याही स्थितीत विधानसभा लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय घेतला.

आम्ही कुणालाही थाबंवणार नाही
भाजपने हर्षवर्धन पाटील यांना मागे उमेदवारी दिली होती. पण ते पराभूत झाले. आता पुन्हा निवडणूक आली आहे. पण महायुतीची परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. महायुती नसती तर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असती, ज्यांच्यापुढे विधानसभा लढण्याशिवाय दुसरा कोणताही मार्गच नाही असे 2-4 लोक जातील. त्यांच्या राजकीय भवितव्याला आम्ही ब्रेक लावणार नाही. त्यांना दुसरीकडे जाऊन निवडून येऊ असे वाटत असेल. त्यांनी आम्ही थांबवणारही नाही. पण तूर्त आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहोत.

केंद्रात भाजपचे सरकार आहे. तिथेही काही व्यवस्था आहे. तिथेही काहींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याशिवाय काही जणांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना कोणतीही घाई नाही. त्यांची पक्ष सांगेल ती भूमिका घेण्याची तयारी आहे. अशा लोकांचीही यादी खूप मोठी आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.