Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी आमदारांना 20 हजार रुपयांची पेन्शन वाढविण्याचा प्रस्ताव! माजी आमदारांच्या पेन्शनवर 70 कोटी तर आमदारांच्या वेतनावर दरवर्षी 137 कोटींचा खर्च

माजी आमदारांना 20 हजार रुपयांची पेन्शन वाढविण्याचा प्रस्ताव! माजी आमदारांच्या पेन्शनवर 70 कोटी तर आमदारांच्या वेतनावर दरवर्षी 137 कोटींचा खर्च
 

एकदा आमदार झाल्यावर पुन्हा निवडून नाही आलात किंवा निवडणूक नाही लढली, तरी त्या माजी आमदारांना कायमस्वरुपी पेन्शन मिळते. पहिल्या टर्मसाठी ५० हजार रुपये आणि त्यानंतर पुढील टर्मच्या प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची पेन्शन आहे.

सध्या राज्यातील सुमारे ९०० माजी आमदारांच्या पेन्शनसाठी दरवर्षी अंदाजे ७० कोटी रूपये लागतात. आता माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये २० हजाराची वाढ करण्याचा प्रस्ताव असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमदार म्हणून मतदारसंघातील जनतेची सेवा करणाऱ्या माजी आमदारांना आयुष्यात कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणून राज्याच्या तिजोरीतून त्यांना दरमहा ५० हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. याशिवाय एकपेक्षा अधिक टर्म आमदार राहिलेल्यांना पुढील टर्मच्या प्रत्येक वर्षासाठी दोन हजार रुपये अतिरिक्त पेन्शन मिळते. एक लाखांहून अधिक पेन्शन घेणाऱ्या माजी आमदारांचीही संख्या १५ हून अधिक आहे. या माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये २० हजार रुपयांची वाढ करावी, असा प्रस्ताव विधी मंडळाकडून मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर तो पुन्हा दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आला आणि पुन्हा तो प्रस्ताव दुरुस्तीसह मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. पण, अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. आगामी काळात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, आमदार, माजी आमदारांचे वेतन, पेन्शनसाठी राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी साधारणत: २०७ कोटी रुपये द्यावे लागतात. हाच धागा पकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आम्हालाही जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली आहे.

आमदारांना दरमहा तीन लाखांचे वेतन

राज्याच्या विधानसभेचे २८८ आमदार तर विधान परिषदेचे ७८ आमदार, यांना दरमहा वेतन दिले जाते. अधिवेशन काळात विशेष भत्ता देखील मिळतो. याशिवाय दूरध्वनी खर्चापोटी आठ हजार रुपये, स्टेशनरी खर्चासाठी दहा हजार रुपये आणि संगणक खर्च दहा हजार रुपये आणि स्विय सहायक व चालकाचेही मानधन सरकारकडून दिले जाते. प्रत्येक आमदारास साधारणत: तीन लाख रुपयांचे वेतन मिळते, अशी सद्य:स्थिती आहे. याशिवाय मंत्री- राज्यमंत्री व मुख्यमंत्री यांचे वेतन आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक असते.

आजी-माजी आमदार व वेतन-पेन्शनची स्थिती

एकूण आमदार

३६६

दरमहा प्रत्येकी वेतन

३ लाख रुपये

माजी आमदार

९००

दरमहा पेन्शन

५० हजार ते १ लाख

दरवर्षीचा अंदाजित निधी

२०७ कोटी

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.