Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

20, 21, 22, 23 सप्टेंबर, चार दिवस बँका राहणार बंद

20, 21, 22, 23 सप्टेंबर, चार दिवस बँका राहणार बंद
 

मुंबई : सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. नुकतेच गौरी-गणपती हे सण मोठ्या उत्साहात पार पडले आहेत. आगामी काळात सप्टेंबर महिन्यात आणखी सण आहेत. याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यात देशात वेगवेगळ्या ठिकाणी बँका साधारण 15 दिवस बंद असणार आहेत.

विशेष म्हणजे शाळा, कॉलेज यांनादेखील या महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. 14, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी बँका सलग तीन दिवस बंद होत्या. त्यनंतर आता 20 ते 23 सप्टेंबर अशा एकूण चार दिवस बँका बंद असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बँका सलग चार दिवस बंद का असणार आहेत? हे जाणून घेऊ या..  14 सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार होता. त्यामुळे देशभरातील बँका त्या दिवशी बंद होत्या. त्या ईद-ए-मिलाद या सणामुळेदेखील देशातील सर्व शासकीय आणि खासगी बँका बंद होत्या. 

आता सलग चार दिवस सुट्टी राहणार

आता 20 ते 23 सप्टेंबर अशा एकूण चार दिवस बँका बद असतील. शुक्रवारी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी असेल. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि श्रीनगर येथील सर्व बँका बंद असतील. त्यानंतर शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधि दिवस आहे. त्यामुळे या दिवशी केरळमधील सर्व शासकीय आणि खासगी बँका बंद असतील. सोमवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी महाराजा हरी सिंह यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे जम्मू आणि श्रीनगर येथील बँका बंद असतील. 

नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुविधा चालू राहणार

बँका बंद असल्या तरी या काळात ऑनलाईन बँकिंग चालूच राहील. म्हणजेच मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे व्यवहार करू शकता. तुम्हाला ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करता येईल. 

जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहणार
20 सप्टेंबर - ईद-ए-मिलाद-उल-नबी ( शुक्रवार) -जम्मू आणि श्रीनगर

21 सप्टेंबर- श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) - केरळ 

22 सप्टेंबर - रविवार - संपूर्ण भारतात बँका बंद 

23 सप्टेंबर - सोमवार - महराजा हरी सिंह यांची जयंती ( जम्मू और श्रीनगर )

दरम्यान, महाराष्ट्रात 20, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी बँका चालू राहतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.