Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू
 

छत्तीसगढमधील चांपा जिल्ह्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने कुटुंबियांसमवेत विष खाल्लं आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे.

दरम्यान, विष खाल्लेल्या चौघांना उपचारासाठी बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंबाने जीवन का संपवले? हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून घर सील करण्यात आले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

31 ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झालाय 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक 10) यांनी त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे. एसपी राजेंद्र जयस्वाल म्हणाले, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय 55), मुलगा सूरज यादव (वय 27) आणि निरज यादव (वय 32) यांच्यासमवेत विष प्राशन केले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात निरज यादव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तिघांना हलवण्यात आले होते. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झालाय. 

काँग्रेस नेत्याने काढलं होतं 40 लाखांचं कर्ज 

अधिकच्या माहितीनुसार, पंचराम यादव काँट्रॅक्टरचे काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून 40 लाखांचे लोन घेतले होते. शिवाय त्यांना ह्रदयाशी निगडीत आजारही होता. शिवाय पंचराम यादव यांच्या पत्नी कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांचा मुलगा निरज यादव खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे काँट्रॅक्ट घेत होता. 

घरातील दोन्ही बाजूंचे गेट बंद करुन जीवन संपवले

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आपण टोकाचं पाऊल उचलत आहोत, याबाबत कोणाला माहिती मिळू नये यासाठी नेत्यासह कुटुंबियांनी घरा बाजूचे दोन्ही गेट बंद केले होते. दोन्ही बाजूंनी कुलुप लावले आणि तिसऱ्या ठिकाणी आतून कुलुप लावत त्यांनी आत्महत्या केली आहे. एक मुलगी त्यांच्या घरी गेली, तेव्हा याबाबतचा खुलासा झाला. सातत्याने आवाज देऊनही कोणीही दरवाजी उघडत नव्हते. त्यामुळे तिला संशय आला आणि तिने आजूबाजूच्या इतर लोकांना याबाबतची माहिती दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.