Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1 लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी जाळ्यात

1 लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी जाळ्यात
 

नाशिक :- 1 लाख रुपयांची लाच घेताना ग्राम विस्तार अधिकाऱ्यासह सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सुनिल अमृत पाटील (वय 58, ग्रामविस्तार अधिकारी नेमणूक प. स.पारोळा (ग्रां. विभाग वर्ग ३) व कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय 28, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी सेवक) नेमणूक प.स. पारोळा अशी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

 
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे सरपंच यांचा मुलगा असून त्यांचे गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत काँक्रेट व पेव्हर ब्लॉकचे एकूण चार कामाचे प्रत्येकी 15 लाख रुपये प्रमाणे एकूण 60 लाखाचे काम शासनाकडून मंजूर होवून आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी कल्पेश बेलदार याने बीडीओ यांचे दोन टक्के प्रमाणे व स्वतःसाठी एक टक्के प्रमाणे अशी लाचेची मागणी केली होती.

त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे दि.10/09/2024 रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता सुनील पाटील यांनी प्रोत्साहन देऊन व बेलदार यांनी पंचासमक्ष तडजोडअंती 1,00,000 रुपये बीडीओ साठी लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम बेलदार हे स्विकारतांना मिळून आले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर पारोळा पोलीस स्टेशन, जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, नैत्रा जाधव, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक पोहेकॉ. सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे, पोहेकॉ सुनिल वानखेडे, पोना. किशोर महाजन, पोना. बाळू मराठे यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.