Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरीरात दुप्पट वेगाने वाढणार व्हिटॅमिन बी 12, सेवन करा फक्त हे पदार्थ

शरीरात दुप्पट वेगाने वाढणार व्हिटॅमिन बी 12, सेवन करा फक्त हे पदार्थ
 

तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 या पोषक तत्वाची कमतरता आहे. त्याची कमतरता स्नायूंपासून हाडांपर्यंत प्रत्येक अवयवावर परिणाम करू शकते.

शरीराच्या विकासासाठी प्रोटीननंतर व्हिटॅमिन बी 12 हे सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे. व्हिटॅमिन बी 12 अनेक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते.

व्हिटॅमिन बी 12 हा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे. आठ आवश्यक जीवनसत्त्वांचा समूह आहे. ही जीवनसत्त्वे शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन बी 12 नैसर्गिकरित्या काही पदार्थांमध्ये आढळते आणि ते पूरक म्हणून देखील घेतले जाऊ शकते.

शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन बी12 महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींची कमतरता होऊ शकते, ज्याला ॲनिमिया म्हणतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, मुंग्या येणे आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. डीएनए बनवणे आणि दुरुस्त करण्यातही व्हिटॅमिन बी 12 महत्वाची भूमिका आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.