Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
 

शिवसेनेचे  आमदार संजय गायकवाड  यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे.

राहुल गांधी  यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे.

राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल. महाराष्ट्र आणि देशात आरक्षणाची आग लागली आहे. त्यातच मागासलेल्या जातींना इतर समाजांच्या बरोबरीनं उभं करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. असं असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आमच्या देशातलं आरक्षण मला संपवायचंय, असं वक्तव्य केलं. काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्यांच्या पोटातील मळमळ त्यांनी ओकून दाखवली. संविधान धोक्यात आहे, संविधानात आपलं आरक्षण संपवणार आहे, असा फेक नरेटिव्ह पसरवला आणि दलित समाजाची मतं घेतली. आणि आज आरक्षण संपवण्याची भाषा करतायत, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.