Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! उत्पादन शुल्कच्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू

धक्कादायक! उत्पादन शुल्कच्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू
 

रांची : झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून नोकरीसाठी शारीरिक चाचणीत सहभागी झालेल्या 11 युवकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या उत्पादशुल्क विभागात शिपाई पदासाठी ही शारीरिक चाचणी घेण्यात येत होती.

या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलपदासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी 22 ऑगस्ट रोजी झारखंडमधील सात केंद्रांवर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या घटनेची माहिती देताना ऑपरेशन विभागाचे महासंचालक अमोल होमकर यांनी सांगितलं की, "दुर्दैवाने शारीरिक धावण्याच्या चाचण्यांदरम्यान 11 उमेदवारांचा मृत्यू झाला. पलामूमध्ये 4, गिरीडीह आणि हजारीबागमध्ये प्रत्येकी दोन आणि रांची, पूर्व सिंगभूम आणि साहिबगंजमध्ये प्रत्येकी 1 तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्यात येणार

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस प्रवक्ते अमोल व्ही होमकर म्हणाले की, शारीरिक निवड प्रक्रियेत आतापर्यंत 1,27,732 उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यात 78,023उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांची संख्या 56,441 तर महिला उमेदवारांची संख्या 21,582 होती. उमेदवारांच्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.

झारखंडचे राजकारणही तापले

राज्यातील विरोधी पक्ष भाजपनेही उमेदवारांच्या मृत्यूवरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडले आहे. या प्रकरणाबाबत राज्यसभा खासदार आदित्य साहू यांनी सरकारच्या नियुक्ती नियमांवर प्रश्न उपस्थित केला असून मृत उमेदवारांच्या आश्रितांना 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी आणि त्यांना नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्ष जेएमएमचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले की, अशा मुद्द्यांवर राजकारण करू नये. सरकार या प्रकरणी गंभीर असून मृतांच्या कुटुंबीयांच्या बाबतीतही संवेदनशील आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.