पोस्टाच्या जास्त परतावा मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये एका बेस्ट योजनेचं नाव सांगायचं झालं तर सर्वातआधी पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजे पीपीएफ ही योजना आठवते. पोस्टाची पीपीएफ ही योजना लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध आहे.
प्रत्येक प्रवर्गातील व्यक्ती पीपीएफ योजनेचा लाभ घेऊ शकतो. योजनेमध्ये पैसे गुंतवणुकीची लिमिट कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत आहे. या योजनेमध्ये टॅक्स बेनिफिट्स असून ही योजना 15 वर्षा नंतर मॅच्युअर होते.
तीन प्रकारचे टॅक्स वाचतील :
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हाइडेंट फंड ही योजना EEE म्हणजेच Exempt Exempt Exempt अशा तीन कॅटेगिरीचे टॅक्स वाचले जातील. या कॅटेगिरीमध्ये येणाऱ्या योजनांमध्ये जमा झालेल्या रक्कमेवर टॅक्स लावले जात नाही. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या व्याजावर देखील टॅक्स लावले जात नाही. म्हणजेच काय तर, इंटरेस्ट, इन्व्हेस्टमेंट आणि मॅच्युरिटी या तिघांवर टॅक्स वाचला जातो.
पीपीएफ योजनेत गुंतवणूकदाराला एवढे मिळते व्याजदर :
तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी म्हणजेचं लॉंगटर्मसाठी पैसे गुंतवायचे असतील तर, पीपीएफ ही योजना तुमच्यासाठी एकदम जबरदस्त योजना ठरेल. कारण की या योजनेमध्ये तुम्ही एक्सटेंड नियम देखील वापरू शकता. एक्सटेंड नियमामुळे तुमच्या खात्यात जास्तीची रक्कम फक्त व्याजदरानेच जमा होते. ही योजना तुम्हाला 7.1% व्याजदर देते. त्यामुळे तुम्ही फक्त 1000 रुपये गुंतवून 8 लाखांचा फंड तयार करू शकता.
असे जमा करा 8 लाख रुपये :
तुम्हाला दीर्घकाळासाठी चांगला फंड जमा करून ठेवायचं असेल तर, प्रत्येक महिन्याला 1000 रुपये गुंतवावे लागतील. एका वर्षामध्ये ही अमाऊंट 12,000 होईल. त्यानंतर तुमची पीपीएफ योजना 15 वर्षानंतर मॅच्युअर होईल. परंतु तुम्हाला ही स्कीम तशीच न ठेवता 5-5 वर्षांमध्ये वाढवायची आहे. म्हणजे तुमची योजना बरोबर 25 वर्षांपर्यंत सुरू राहील.
आता समजा 25 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला हजार रुपये गुंतवले असता तुमच्या खात्यात एकूण 3,00,000 रुपयांएवढी रक्कम जमा होईल. दिलेल्या व्याजदराच्या हिशोबाने फक्त व्याजाचीच रक्कम 5,24,641 एवढी होईल. म्हणजेच 25 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यात 8,24,641 एवढा मोठा फंड जमा होईल. परंतु ही योजना तुम्ही पाच-पाच वर्षांनी वाढवून कॉन्ट्रीब्युशन देखील करू शकता.
कॉन्ट्रीब्युट करत एक्सटेंड करा होईल फायदा :
पीपीएफ योजना 5-5 वर्षांच्या कार्यकाळानुसार एक्सटेंड केली जाते. ही योजना दोन प्रकारे एक्सटेंड करण्यासाठी दोन पर्याय दिले जातात. यामधील पहिला पर्याय म्हणजे पाच पाच वर्षांनंतर योजना एक्सटेंड करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पाच पाच वर्षांमध्ये योजना एक्सटेंड करत कॉन्ट्रीब्युशन देखील सुरू ठेवणे.
तुम्हाला सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करत स्कीम एक्सटेंड करायची असेल तर, सर्वप्रथम बँकेत किंवा जवळील पोस्ट ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन जाऊन द्यावं लागेल. तुम्हाला हे ॲप्लिकेशन स्कीम मॅच्युअर होण्याच्या एक वर्षाआधी जाऊन द्यावं लागेल. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही ज्या बँकेत पीपीएफ अकाउंट ओपन केलं आहे तिथेच जाऊन ॲप्लिकेशन द्या. जर असं नाही केलं तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.