Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानसभेसाठी RSS चा मेगा प्लॅन; 'या' नेत्याला मैदानात उतरवणार, भाजपला फायदा होण्याचा अंदाज

महाराष्ट्र विधानसभेसाठी RSS चा मेगा प्लॅन; 'या' नेत्याला मैदानात उतरवणार, भाजपला फायदा होण्याचा अंदाज
 

राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. सद्य परिस्थिती पाहता नक्की कोणाला यश मिळणार हे सांगता येणे कठीण आहे.

निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मविआ आणि महायुतीतील सहभागी पक्ष देखील स्वतंत्रपणे किती जागा जिंकू शकतो किंवा कोणाला सत्ता मिळू शकते याचा अंतर्गत सर्व्हे करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मैदानात उतरवले अशी आग्रही भूमिका संघाने घेतल्याचे समजते आहे.

सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता व सर्व घडामोडींमुळे भाजपसमोर निर्माण झालेले आव्हान पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचे समजते आहे. नितीन गडकरींची राज्याच्या जनतेची मनात असलेली चांगली प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्र भाजपच्या मदतीचे ठरतील असे संघाला वाटत आहे. मात्र भाजपने यावर अजून अंतिम निर्णय घेतला नसल्याचे समजते आहे.
केंद्रातील मोदी सरकारमधील काही मंत्र्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली आहे. त्यात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर नितीन गडकरींचे देखील नाव घेतले जाते. गडकरी हे केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा महाराष्ट्र भाजपला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो असे संघाचे मत आहे.

नितीन गडकरींना राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय करावे असे संघाचे मत आहे. दरम्यान गडकरींना राज्याच्या प्रचारात सक्रिय करायचे की नाही याबद्दल भाजपने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. सद्य स्थितीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते सध्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी-फडणवीस जोडी भाजपसाठी फायदेशीर ठरेल असे भाजपला वाटत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये समन्वयराहावा यासाठी संघाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.