चंद्रचूडांनी बंगाल सरकारला झापले, आरोपीला म्हटले 'जनावर'! NTF स्थापन. सुप्रीम कोर्टात काय झालं?
कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाची स्वतः दखल घेतली आहे. चंद्रचूड यांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीर मानले असून, आरोपीला 'जनावर' असे
संबोधले आहे. त्यांनी पश्चिम बंगाल सरकारकडून याबाबत कठोर विचारणा केली
आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
FIR उशिरा दाखल का? कोर्टाचा सरकारला प्रश्न-
सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला विचारले की, FIR इतक्या उशिरा का दाखल करण्यात आली? अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली का? पीडितेच्या कुटुंबाला मृतदेह उशिरा का देण्यात आला? याच रात्री हॉस्पिटलवर जमावाने हल्ला कसा केला? या सर्व प्रश्नांवर पश्चिम बंगाल सरकारने समाधानकारक उत्तर देण्यास असमर्थ ठरले. CJI चंद्रचूड यांनी पोलिसांनी क्राईम सीन सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याची माहिती विचारली.
राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश-
चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणावरील पुढील प्रक्रियेचा आढावा घेतला आणि एक राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले. या टास्क फोर्समध्ये देशभरातील डॉक्टरांचा समावेश असेल आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती आखण्यास सांगितले जाईल. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी एक राष्ट्रीय सहमति तयार होणे आवश्यक आहे, विशेषतः महिला डॉक्टरांच्या सुरक्षा आणि कामकाजाच्या तासांच्या बाबतीत.
सीबीआयकडून स्टेटस रिपोर्टची मागणी-
सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडून या प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. CJI चंद्रचूड यांनी कोर्टाला माहिती दिली की, हे प्रकरण केवळ कोलकाताचे नाही, तर देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. कोर्टाने हे देखील नमूद केले की, आम्ही या प्रकरणावर स्वतः लक्ष ठेवणार आहोत आणि याबाबत संपूर्ण तपासाची देखरेख करू.
दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिली याचिका-
या प्रकरणात दिल्ली मेडिकल असोसिएशनने स्वतः संज्ञान घेतलेल्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. तसेच फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (FORDA) देखील सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय समुदायात मोठी प्रतिक्रिया उमटली आहे. कोलकातामध्ये पीडितेच्या मित्रांनी काळी फीत बांधून विरोध दर्शवला आहे, तसेच मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी भिंतीवर चित्र उकेरून आपला विरोध आणि पीडित कुटुंबासाठी एकजूट व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.