कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री 'सेक्स स्कँडल'मध्ये सामील? CD प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वकिलाचा खळबळजनक दावा
बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सीडी प्रकरणामुळे
प्रसिद्धीच्या झोतात आलेले वकील जगदीश यांनी आता एका माजी
मुख्यमंत्र्यांविरोधातील 'सेक्स स्कँडल'बाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार
असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.
अनेक
दिवसांनंतर सोशल मीडियावर व्यक्त झालेले ॲड. जगदीश यांनी अचानक माजी
मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या रॅकेटमध्ये या माजी
मुख्यमंत्र्यांसोबतच त्यावेळचे अन्य दोन मंत्रीही सहभागी असून, त्यापैकी एक
आता खासदार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ते मुख्यमंत्री असताना ते
नंदीबेट्ट येथे गेले होते. त्यावेळी मुलींचा वापर करून माजी
मुख्यमंत्र्यांना या रॅकेटमध्ये सहभागी करून दोन तत्कालीन मंत्री आणि १५ ते
२० अधिकाऱ्यांनी विविध लाभ घेतले.
तसेच, कोट्यवधी रुपये उकळले व बेकायदेशीर कामांतील कारवाईपासून संरक्षण मिळवले. आम्ही या घोटाळ्याची कागदपत्रे गोळा केली आहेत. त्यावरून हे आरोप प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. या रॅकेटसाठी परराज्यातून अभिनेत्री आणि मुलींना बोलावण्यात आले होते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. बहुसंख्य मुली इतर प्रलोभनांमुळे अशा कृत्यात सामील होतात. सत्तेत असताना अशाप्रकारच्या जाळ्यात पडून सर्व फायलींवर सह्या घेतल्या जातात. आम्ही फक्त प्रशासकीय आणि तिजोरीचे काय नुकसान होते, यावर लक्ष केंद्रित करत आहोत.दिल्लीतील वकिलांचे पथक यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कागदपत्रे तयार करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नंदीबेट्ट आणि इतर ठिकाणी घेऊन गेलेल्या लोकांनी व्हिडीओ बनवून करून ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे. यामध्ये आरोपी आणि मध्यस्थ महत्त्वाच्या पदांवर असल्याने आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांना यासंदर्भात माहिती देणार आहोत. याचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हायला हवा. व्हिडीओमधील व्यक्तीची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे, असे जगदीश म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.