Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

CBI ने कोलकाता अत्याचार प्रकरणातील आरोपींची पॉलीग्राफ चाचणी केली, विचारले हे 20 प्रश्न

CBI ने कोलकाता अत्याचार प्रकरणातील आरोपींची पॉलीग्राफ चाचणी केली, विचारले हे 20 प्रश्न
 

कोलकाता येथील महिला ट्रेनी डॉक्टरची अत्याचार केल्यानंतर हत्या झाल्याने देश सुन्न आहे.या प्रकरणात सीबीआयने या प्रकरणातील आरोपी संदीप घोष सह सात लोकांची पॉलीग्राफ टेस्ट केली आहे. मुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ टेस्ट जेलमध्ये करण्यात आली.

तर माजी प्रिन्सिपल संदीप घोष आणि घटनेच्या दिवशी ड्यूटीवर हजर असलेले चार डॉक्टर आणि एका सिव्हील वॉलंटियर सह इतर सहा लोकांची सीबीआयच्या मुख्यालयात पॉलीग्राफ सत्य शोधन चाचणी घेण्यात आली.

टेस्ट दरम्यान कोणते प्रश्न विचारले गेले ?

यावेळी विचारण्यात आलेले 20 प्रश्न खालील प्रमाणे

1. तुझं नाव संजय रॉय आहे का ?
 
2. तु कोलकातामध्ये राहायला आहेस का ?

3. तू घटनेच्या दिवशी रुग्णालयात होतास का ?

4. तुला मोटरसायकल चालवायला येते का ?

5. तू पीडीतेवर अत्याचार केलास का ?

6. तू पीडीतेला ठार मारले का ?

7. तू कधी खोटं बोललास का ?

8. टॉमेटोचा रंग लाल असतो का ?

9. तु पीडीतेला ओळखत होतास का ?

10. हा खून करताना तुझ्या सोबत कोण होते?

11. तु खून केल्यानंतर रुग्णालयातून पळून गेलास का ?

12. तू याआधी पीडीतेची छेड काढलीस का ?

13. तू पोर्न फिल्म पाहातोस का ?

14. तु डॉ. संदीप घोष याला ओळखतोस का ?

15. तू संदीप घोष यांना खून केल्याची माहीत दिली का?

16. तू पीडीतेची हत्या करण्यापूर्वी रेड लाइट एरियात जाऊन आला होतास का ?

17. सेमिनार हॉलमध्ये तुझ्या सोबत आणखी कोणी होते का ?

18. या घटनेबाबत तू कोणाला माहीती दिली होती का ?

19. सेमिनार हॉलमध्ये तुझे ब्लूटूथ तुटले होते का ?

20. तू सगळ्या प्रश्नांची उत्तरे खरी दिली आहेत का?


सीबीआयने पॉलीग्राफ चाचणी दरम्या माजी प्रिन्सिपल संदीप घोष यास सुमारे 25 प्रश्न विचारण्यात आले. बातमीनूसार पॉलीग्राफी टेस्ट दरम्यान आरोपीला भ्रमित करण्यासाठी काही अनावश्यक प्रश्न देखील विचारण्यात आले. सीबीआय पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान संदीप घोष याला 25 प्रश्न विचारण्यात आले. बातमीनूसार पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान आरोपींना काही वेगळे प्रश्न देखील विचारण्यात आले. उदा. आकाशाचा रंग कोणता आहे. आज कोणती तारीख आहे ? असे प्रश्न मुद्दामहून विचारले गेले.

9 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या छाती विकार डिपार्टमेंटच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. मृतदेहावर गंभीर जखमा होत्या. दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलचा स्वयंसेवक रॉय याला अटक झाली. 13 ऑगस्ट रोजी कोलकाता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास काढून सीबीआयच्याताब्यात सोपविण्याचा आदेश कोलकाता हायकोर्टाने दिला. सीबीआयने 14 ऑगस्ट पासून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पॉलीग्राफ चाचणी म्हणजे काय ?

पॉलीग्राफ चाचणीला लाय डिटेक्टर चाचणी देखील म्हणतात. या चाचणी दरम्यान, आरोपीच्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासाची गती, नाडी, रक्तदाब, घाम येण्याची क्रिया यासह व्यक्तीच्या अनेक शारीरिक बदलाची नोंद प्रत्येक प्रश्नाच्या वेळी घेतली जाते. त्याआधारे ती व्यक्ती खरं बोलतेय की खोटे याची तपासणी केली जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.