२० वर्षीय मुलाच्या समोरच ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार : ८ जणांना अटक
बगळुरू (कर्नाटक) - येथे २० वर्षांच्या मुलाच्या समोरच त्याच्या ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमध्ये २ महिलांनी बलात्कार्यांना साहाय्य केले. त्यांच्यासमोर ही घटना घडत असतांना त्या शांतपणे त्याकडे पहात होत्या.
पीडित महिलेवर रग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी जोसेफ, श्रीनिवास उपाख्य पागल सीना यांच्यासह सौम्या प्रताप, जतिन, विघ्नेश, सैयद शहाबुद्दीन, स्वाती आणि मादेश यांना अटक केली आहे. पीडित महिला, तिचा मुलगा आणि आणखी काही जण चंद्रलेआऊट पोलीस ठाण्याच्या परिसरात रहातात. या भागातील गुंड जोसेफ आणि श्रीनिवास यांना पीडिता अन् तिचा मुलगा यांची ओळखत होते. भ्रमणभाष आणि सोनसाखळी यांच्या चोरीच्या प्रकरणात पीडिता आणि तिचा मुलगा सहभागी असल्याचे आरोपींना समजले होते. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपींना या दोघांचे अपहरण करून वरील कृत्य केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.