राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच मंगळवेढा शहरातील भाऊ- बहिणीचा अपघात झाला. या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या मंगळवेढ्यातील बहीण- भावाच्या पार्थिवावर रविवारी रात्री उशिरा १२ वाजण्याच्या सुमारास सांगोला नाक्यावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
करण्यात आले. दाढ दुखीने घात केला, असा टाहो आईने फोडला आणि वातावरण
धीरगंभीर झाले.
बहिणीची दाढ दुखत असल्यामुळे भाऊ पंढरपूरला दवाखान्यात उपचार करण्यासाठी घेऊन गेला. उपचार करून माघारी परतत असताना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी अपघात झाला. बांधकाम मटेरियल सप्लायर व्यावसायिक उद्योजक तात्या जाधव यांची एकुलती एक मुलगा व मुलगी असून, मुलगा रोहित पुणे येथे जिमचे क्लास घेण्यासाठी कोचिंगचे शिक्षण घेत होता.
तो बारावी पास होता. मुलगी ऋतुजा बीएमआयटी कॉलेज तिहे सोलापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती.
जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जाधव कुटुंब मूळता बांधकाम क्षेत्राशी निगडित आहे. मृत रोहितचे आजोबा पंडू जाधव हे गवंडी काम करत असत. मंगळवेढा शहरातील मोठ्या इमारती त्यांनीच बांधल्या आहेत.तात्या जाधव हे बांधकामाला लागणाऱ्या खडी, वाळू, मुरूम जेसीबी पोकलेन इत्यादीचे ठेकेदार म्हणून प्रसिद्ध आहेत. तिसऱ्या पिढीतील रोहित हा देखील वडिलांना मदत करीत होता. जिम कोचिंग सुरु करण्याची त्याची तयारी होती.(स्रोत:दिव्य मराठी)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.