तर सत्तेतून बाहेर पडलेलं बरं; निवडणुकीपूर्वी दादा गटाने टाकला बॉम्ब
आगामी विधानसभा निवडणुकीतच महायुतीत मध्ये वादाचा खडा पडला आहे. राज्याचे
सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा
निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
हा वाद इतका वाढला कि अजित पवार यांच्या जवळच्या नेत्याने थेट आपण सत्तेतून
बाहेर पडूया असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना केलं
आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीत टशन पाहायला मिळत आहे. नेमकं घडले
तरी काय ते आपण जाणून घेऊया….
तानाजी सावंत काय म्हणाले होते?
धाराशिव
येथे एका कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत म्हणाले की, मी हाडामासाचा
शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले
नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. कारण ते विचार
परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही सर्वजण त्यांच्या
मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन
होत नाही, ते आता वयाच्या 60 व्या वर्षी माणूस बोलू शकत नाही असे विधान
तानाजी सावंत यांनी केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना दादा गटाचे
प्रवक्ते उमेश पाटील यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला.
उमेश पाटील काय म्हणाले?
ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही. तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू, आपल्याला सत्तेची गरज नाही. असं उमेश पाटील म्हणाले. तानाजी सावंत यांचा बोलण्याचा काय संबंध आहे? एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले. त्याच भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले. हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने घेतला होता. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये. या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही", असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.