"... तर राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन"
मराठा आरक्षणबाबत आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या आरोपांवर फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "जर मी आरक्षण थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेईल", असं त्यांनी म्हटलं आहे.
फडणवीस म्हणाले, "मनोज जरांगेंचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात, हे मला सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणं सर्व मंत्री काम करत असतात. मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील त्याला तर माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ असतंच. त्यामुळं याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच हा प्रश्न विचारावा. जर त्यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणासाठी मी कुठलाही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फडणवीसांनी थांबवला. तर त्याचक्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन अन् राजकारणातून निवृत्ती घेईल"दरम्यान, आत्तापर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले आहेत. हे निर्णय एकतर मी घेतलेले आहेत किंवा एकनाथ शिंदेंनी घेतले आहेत. त्यामुळं माझा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचं नरेटिव्ह जाणिवपूर्व तयार करण्याचा प्रयत्न करणं हे अयोग्य आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.