Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मी महाविकास आघाडीसोबत, शिंदे गटाच्या नेत्याला पाठिंबा नाही', ठाकरे गटाच्या टीकेनंतर विशाल पाटलांचा खुलासा!

मी महाविकास आघाडीसोबत, शिंदे गटाच्या नेत्याला पाठिंबा नाही', ठाकरे गटाच्या टीकेनंतर विशाल पाटलांचा खुलासा!
 

सांगली लोकसभेनंतर विधानसभेलाही सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरे गट विरुद्ध काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यामध्ये सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विशाल पाटील यांनी खानापूर मतदार संघामध्ये शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिला होता.

ज्यावरुनच ठाकरे गटाने जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर खासदार विशाल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले असून मी सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही तर माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिले असा खुलासा त्यांनी केला आहे. 

काय म्हणाले विशाल पाटील?

समोर आलेल्या माहितीनुसार, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांच्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. मी सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नसून मी अपक्ष असल्याने सुहास बाबर यांना माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मी शिंदे गटासोबत किंवा महायुतीसोबत अशा चर्चा या निरर्थक असून मी महाविकास आघाडीसोबतच ठामपणे असल्याचे पुन्हा एकदा विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

मराठा आरक्षणाला पाठिंबा

ओबीसी महामेळावा हा भाजपा पुरस्कृत नसला तरी त्याला काही लोकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला अशी टीकाही यावेळी खासदार विशाल पाटील यांनी केली. सांगलीतील ओबीसी मेळाव्यात अनेक राजकीय मंडळींनी स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा भाजपा पुरस्कृत मेळावा नसला तरी याला राजकीय रंग देऊन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण मागणीला माझा पाठिंबा आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले .

आयुक्तांची पाठराखण

दरम्यान, महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधारी टोळी महापालिकेची लूट करीत असून आयुक्तांनी त्या भानगडीवर अंकुश ठेवल्याने त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात असल्याची प्रतिक्रिया खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी पूर्ण करावी. आयुक्त दोषी ठरले तर मी स्वतः बदलीची मागणी करेन मात्र सांगलीत आल्यापासून त्यांनी महापालिकेत चांगले काम केले आहे असे म्हणत आयुक्त शुभम गुप्ता यांची खासदार विशाल पाटील यांनी पाठराखण केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.