राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय संघात निवड; थेट ऑस्ट्रेलियाला भिडणार
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मुलाची आगामी १९वर्षांखालील मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. समितने नुकत्याच सुरू असलेल्या महाराजा ट्वेंटी-२० लीगमध्ये दमदार फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि चार दिवसीय सामन्यांसाठीच्या मालिकेसाठी BCCI ने आज संघ जाहीर केला. या दोन्ही संघांत समित द्रविडचे नाव आहे.
Squad for series:
वन डे मालिकेसाठी संघ: रुद्र पटेल, साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमान ( कर्णधार ), किरण चोरमाले, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पनगालिया, समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद इनान
चार दिवसीय मालिकेसाठी संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा, सोहम पटवर्धन ( कर्णधार ), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पनगालिया, चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद इनान
स्पर्धेचं वेळापत्रक
२१ सप्टेंबर - पहिली वन डे ( सकाळी ९:३० वा.), पुद्दूचेरी
२३ सप्टेंबर - दुसरी वन डे ( सकाळी ९:३० वा.), पुद्दूचेरी
२६ सप्टेंबर - तिसरी वन डे ( सकाळी ९:३० वा.), पुद्दूचेरी
३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर - पहिला चार दिवसीय सामना - ( सकाळी ९:३० वा.), चेन्नई
७ ते १० ऑक्टोबर - दुसरा चार दिवसीय सामना - ( सकाळी ९:३० वा.), चेन्नई
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.