ओढणी जनरेटरमध्ये अडकली, डोक्याला दुखापत, मान तुटली; भयंकर अपघातात महिलेचा मृत्यू
मुंबई : सोमवारी सकाळपासून संपूर्ण देशभरात क्रृष्ण जन्माष्टमी साजरी केली गेली. देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं जन्माष्टमी साजरी केली गेली. पण या आनंदाच्या उत्सवाला गालबोट लागलं.
राजस्थानमध्ये एक धक्कादायक अपघात घडला. ज्यामुळे आरडाओरडा सुरु झाला. खरंतर उत्सवात नाच गाण्याचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात नाचणाऱ्या एका महिलेसोबत धक्कादायक अपघात घडला तिची साडी जनरेटरमध्ये अडकली, ज्यामुळे तिच्या डोक्याचे आणि मानेचे तुकडे झाले. हा सर्वात भयानक मृत्यू आहे असंच म्हणावं लागेल. तिथे उपस्थीत एका व्यक्तीच्या फोनमध्ये हा प्रकार कैद झाला.
सार्डिन काढताना जनरेटरमध्ये अडकल्याने अपघात झाला. राजस्थानमधील बाडमेरच्या सिवाना येथील कुंडल गावात मंगळवारी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला. कुंडल येथील रहिवासी माफी देवी या गावातील महिलांसह जन्माष्टमीला श्रीकृष्णाला बोटितून फिरवण्यासाठी तलावावर गेल्या होत्या. तिथे माफी देवी इतर महिलांसोबत गाण्यावर नाचत होती. यावेळी नाचत असताना माफी देवी जनरेटरजवळ पोहोचली आणि तिच्या डोक्यावरील ओढणी जनरेटरमध्ये अडकली.
तिची ओढली ओढली गेल्याने तिचे डोके त्यामध्ये अडकले जे नंतर फुटले. तिच्या केसांसोबत त्वचा वेगळी झाली आणि या फोर्समुळे तिची मानही तुटली. ज्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गेला. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थित महिला आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. माफी देवीची अवस्था पाहून लोक घाबरले. महिला डान्स करताना हा उत्सव एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करत होता, तेव्हाच यामध्ये हा धक्कादायक अपघात कैद झाला.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जनरेटर सोबत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महिला नाचत आहेत, अचानक आरडाओरडा होतो आणि नंतर व्हिडिओ संपतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात खूपच वेदनादायी आहे. अपघाताची माहिती मिळताच महिलेच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. जनरेटर असणारी व्यक्ती फरार झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.