Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिला पत्रकार विनयभंग; वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब

महिला पत्रकार विनयभंग; वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब
 

दलापूरच्या आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाचे वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकाराचा मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषेत विनयभंग केल्यानंतर त्यांच्यावर ३६ तासांनी गुन्हा दाखल झाला.

मात्र वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस या संकेतस्थळावरून हा एफआयआरच पोलिसांनी गायब केल्याने बदलापुरात ‘लाडकी बहीण’ खरोखरच सुरक्षित आहे का, असा गंभीर सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
बदलापुरात 20 ऑगस्ट रोजी आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या दैनिक ‘सकाळ’च्या स्थानिक महिला पत्रकाराला मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे अपमानास्पद आणि अर्वाच्च शब्द वापरले. त्यानंतर त्या महिला पत्रकाराने सातत्याने मागणी केल्यानंतरही तब्बल ३६ तासांनंतर वामन म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करून विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या महिला पत्रकाराला विविध आमिषे दाखवल्यानंतरही ती बघत नसल्याने आता वेगळ्या मागनि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे उघड झाले आहे. राज्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला तर त्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस या वेबसाईटवर नमूद केली जाते. प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात न जाता राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हे याचे उद्दिष्ट. 
मात्र या संकेतस्थळावर 21 ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात झालेल्या सर्व गुन्ह्यांची यादी असताना वामन म्हात्रे यांच्या विरोधातील 0386 क्रमांकाच्या एफआयआरची माहितीच गायब झाली आहे. इतर सर्व क्रमांकाचे एफआयआर नमूद असताना नेमकी वामन म्हात्रे यांच्यावरील गुन्ह्याचा एफआयआर कसा दिसेनासा झाला, असा सवाल विचारला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.