जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत. ; प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आणि OBC समाज यांच्यात आरक्षणावरून वाद सुरु आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही अस वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नागपुरमध्ये वंचितची एल्गार सभा
भाजप-आरएसएस हे आरक्षणविरोधी आहेत, ते बाबासाहेबांची विचारधारा एक एक करून नष्ट करण्याचे काम करत आहेत. अशाच चुकीच्या धोरणांविरोधात 20 ऑगस्ट रोजी नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर…
ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणं गरजेचं आहे, असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी केलंय. जोपर्यंत 100चा आकडा गाठत नाही, तोपर्यंत आरक्षण धोक्यात आहे, असेदेखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.