Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने संपवले जीवन, गुन्हा दाखल होताच तरुण फरार

सांगली :- छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने संपवले जीवन, गुन्हा दाखल होताच तरुण फरार
 

खंडेराजुरी (ता. मिरज) येथे तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून स्वाती रामचंद्र जाधव (वय १९) या महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी साहिल बबन डफेदार (वय २२, रा.खंडेराजुरी) या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर साहिल डफेदार फरार झाला आहे.

स्वाती जाधव ही मिरजेतील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. ती गावातून मिरजेला महाविद्यालयात जाताना व येताना खंडेराजुरी येथे टेम्पोचालक म्हणून काम करणारा साहिल डफेदार गेल्या चार महिन्यांपासून तिची छेडछाड करीत होता. स्वातीने याबाबत पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी साहिल याच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना साहिलविरुद्ध पोलिसात तक्रार देणार असल्याचे सांगितले. यावेळी साहिलच्या आई-वडिलांनी त्यास समजावण्याची तसेच मुलीला यापुढे कसलाही त्रास हाेणार नाही अशी ग्वाही दिल्याने जाधव कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली नाही. 

मात्र, काही दिवसांनंतर साहिल याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून स्वाती हिने दि. १७ ऑगस्ट रोजी घरात कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान २२ रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत रामचंद्र जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, स्वाती जाधव हिला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहिल डफेदार याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.