Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात तरुणीचा निर्घृण खून; डोके, हात, पाय कापून धड नदीपात्रात फेकले

पुण्यात तरुणीचा निर्घृण खून; डोके, हात, पाय कापून धड नदीपात्रात फेकले
 

पुणे : शहरातून खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले आहे. खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हात पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धाड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे.

अज्ञात इसमाने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा-मुठा नदीपात्रात टाकून दिले. अज्ञात व्यक्ती वरोधात त्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.