पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत अटकेत
हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात भांडण सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइतांना सोलापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.
निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय 19, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय 20, रा. हडपसर), अमरसिंग जग्गरसिंग टाक (23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना पाहिले. गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर टाक आणि साथीदार भोंड हे तेथून पसार झालेपोलीस उपायुक्त आर.राजा यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक निरीक्षक गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पसार झालेल्या सराइतांना पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडून पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या ताब्यात दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.