Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासदार विशाल पाटील यांनी अचानक शासकीय रुणालयाला दिली भेट, रुग्णांयातील निवासी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समवाजावून घेतल्या पाटील यांच्यासमोर माडंली कैफियत

खासदार विशालदादा पाटील यांनी अचानक पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाहणी केली व विद्यार्थ्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या.
 

सांगली, ता. २१ : "दादा, इथले मवाली आम्हाला छेडतात. एका इमारतीत बसून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतात. शिकायला आलोय, कुणाची तक्रार करायची? पण हे सहन होत नाही," अशा शब्दांत सांगली, मिरजेतील निवासी, विद्यार्थी डॉक्टर मुलींनी खासदार विशाल पाटील यांच्याकडे आज कैफियत मांडली. येथील वसंतदादा शासकीय रुग्णालय आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहाला अचानक भेट देऊन खासदार पाटील यांनी पंचनामा केला. या ठिकाणी मिळत असलेल्या सुविधांबाबत असमाधान व्यक्त केले. प्रशासनाकडून अत्यंत बेफिकिरी होत असल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने सुधारणा करण्याची सूचना दिली. "हलगर्जीपणा कराल तर खपवून घेणार नाही," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

या भेटीत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. आसपासच्या परिसरातील मवाली; तसेच व्यसनी चोर हे रुग्णालयाच्या व हॉस्टेलच्या परिसरात येऊन रहिवासी विद्यार्थ्यांना त्रास देतात. विचित्र चाळे करतात, अशा तक्रारी करण्यात आल्या. रुग्णालयाच्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही यंत्रणा व पथदिव्यांचा अभाव असल्याचे समोर आले. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण ते बंद आहेत. ते कधीपासून बंद आहेत, याची माहितीच प्रशासनाला नव्हती.
तीन इमारतींत मिळून एक सुरक्षारक्षक आहे. गर्ल्स हॉस्टेलच्या परिसरात गांजा पार्त्या रंगतात. समोरील एका बिल्डिंगमध्ये आसपासच्या मवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. ते तिथेच बसून गांजा फुंकतात. समोरच्या हॉस्टेलमधील मुलींचे व्हिडिओ चित्रित करतात. परिसरातील काही लोकांकडून मुलींची छेड काढली जाते, अशा तक्रारी करण्यात आल्या.
खासदार विशाल पाटील व सौ. पूजा पाटील यांनी त्याबाबत संताप व्यक्त केला. रुग्णालयाला आपण 'आरोग्याचे माहेरघर' म्हणतो. पण त्याच ठिकाणी अस्वच्छता, जैविक कचरा व विषारी जनावरांचा वावर दिसून येतो. त्यातील जबाबदार व्यक्तींची, विद्यार्थिनींशी, डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सोयी-सुविधांचा व कठोर निर्णय तत्काळ घेण्याचा जिल्हा प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्याचे आदेश दिले.
अधिष्ठाता डॉ. पी. डी. गुरव, मेडिकल सुप्रिडेंट डॉ. रुपेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी, 'मी सक्षमा'च्या गीतांजली पाटील वसंतदादा कारखाना संचालक अमित पाटील, माजी जि. प. सदस्य विशाल चौगुले, सावन दरुरे उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.