Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साहेबांची मागणी पूर्ण करा, तेव्हाच ड्युटी लागेल; महिला कंडक्टरसोबत गैरकृत्य, आगारप्रमुखावर गुन्हा

साहेबांची मागणी पूर्ण करा, तेव्हाच ड्युटी लागेल; महिला कंडक्टरसोबत गैरकृत्य, आगारप्रमुखावर गुन्हा
 
 
राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज अत्याचाराच्या नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. अशातच बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

एसटी महामंडळाच्या शेगाव आगारात कार्यरत असलेल्या एका महिला कंडक्टरचा विनयभंग करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेगाव बसस्थानकात  कार्यरत असलेल्या आगारप्रमुखानेच हा विनयभंय केलाय. महिला कंडक्टर ड्युटीची विचारणा करायला गेली असता, आगार प्रमुखाने हात पकडून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.

गोविंदा जवंजाळ असं गुन्हा दाखल  झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय महिला कंडक्टर शेगाव आगारात कार्यरत आहे. शुक्रवारी ड्युटीची वाट पाहत ती बसस्थानकात बसली होती. त्यावेळी तिच्या मोबाइलवर एक मॅसेज आला. साहेबांची मागणी पूर्ण करा, तेव्हाच तुमची ड्युटी लागेल, असा मजकूर या मॅसेजमध्ये होता.

हा मॅसेज वाचताच महिला कंडक्टरला धक्काच बसला. याची विचारणा करण्यासाठी ती आगार प्रमुखाच्या कॅबिनमध्ये गेली. यावेळी गोविंदा जवंजाळ याने महिला कंडक्टरचा हात पकडला. इतकंच नाही, तर तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकारानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून शेगांव पोलिसांनी आरोपी गोविंदा जवंजाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आगार प्रमुखानेच महिला कंडक्टरचा विनभंय केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.