Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत संजयनगर येथे शाळकरी मुलीवर बलात्कार

सांगलीत संजयनगर येथे  शाळकरी मुलीवर बलात्कार 
 

बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना सांगलीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खून प्रकरणातील आरोपीकडून बलात्कार, आरोप पे्रॉल वर आला होता बाहेर, त्यात त्याने केले हे नीच कृत्य. संशयीत संजय प्रकाश माने पोलीसाकडून गजाआड बातमी अपडेट होत आहे.


सांगली शहर पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने हादरले. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या 35 वर्षीय संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच 2 तासात ताब्यात घेतले. संशयित आरोपी संजय माने 2011 साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 15 वर्षाची शिक्षा लागली आहे. तो सध्या पॅरोल रजेवर आला होता.

घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीने कारवाईची मागणी केली.या प्रकरणी आरोपी संजय माने याच्या विरोधात बी एन एस 65(१) , पोक्सो कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय माने यास ताब्यात घेण्यात आले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी कि, गेल्या महिन्यात त्या पिढीत मुलीला तू मला आवडतेस असे म्हणून विनयभंग केला होता. त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. काल 23 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावलं. तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.