Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता तुमचा टायर कधीच पंक्चर होणार नाही, 'या' कंपनीने बाजारात आणला जबरदस्त टायर

आता तुमचा टायर कधीच पंक्चर होणार नाही, 'या' कंपनीने बाजारात आणला जबरदस्त टायर
 

यर पंक्चर होणे या समस्येचा प्रत्येक वाहनचालकाला सामना करावा लागतोच. मात्र आता ऑटो मार्केटमध्ये या समस्येचे निवारण होणार आहे. कारण कधीही पंक्चर न होणारा टायर मार्केटमध्ये आले आहेत. त्यामुळे अचानक गाडी पंक्चर झाली टायरचे पंक्चर काढा मॅकेनिकला बोलवा या त्रासांपासून तुमची मुक्तता होऊ शकते. फ्रान्समधील मिशेलिन कंपनी आहे जी या तंत्रज्ञानावर काम करत आहे. कंपनीने काही देशांमध्ये हे टायर उपलब्ध करुन दिले आहेत. ही फ्रेंच कंपनी लवकरच जगभरात पंक्चर-लेस टायर उपलब्ध करुन देऊ शकते. कंपनीने आपल्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे.

मिशेलिन कंपनीने पंक्चर लेस टायरला मिशेलिन अप्टिस असे नाव दिले आहे. UPTIS म्हणजे युनिक पंक्चर प्रूफ टायर सिस्टम. कंपनीने वेबसाईटच्या माहितीमध्ये लिहिले आहे की, मिशेलिन अप्टिस प्रोटोटाइप एक पंक्चर प्रूफ व्हील आहे ज्यामध्ये दाबलेली हवा नाही. यामुळे टायर प्रेशर आणि पंक्चरची समस्या निर्माण होत नाही. यामुळे पंक्चर झाल्यास वाहनाचा तोल जाण्याची शक्यताही नाहीशी होते. यामुळे चालकाची सुरक्षितताही वाढणार आहे.

या देशांंमध्ये वापरले जातात अप्टिस टायर्स

सिंगापूर, अमेरिका आणि फ्रान्समधील डिलिव्हरी करणाऱ्या वाहनामध्ये अप्टिस टायर्स वापरले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या, जगामध्ये मिशेलिन ही एकमेव कंपनी आहे जी पंक्चरलेस टायरची निर्मिती करत आहे. 2020 पासून,मिशेलिन अप्टिसच्या टायर असलेल्या वाहनांनी 30 लाख किलोमीटरहून अधिकचा प्रवास केला आहे.

टायर्समुळे होणारा फायदा 

या टायरमुळे अगदी बाईक पासून ते ट्रॉलीपर्यंत सर्व वाहनांना प्रचंड फायदा होईल. या टायरच्या वापरामुळे वाहने आणि चालक पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील तसेच टायर पंक्चरमुळे गाडी च्या नियंत्रणामध्येही चालकाला समस्या जाणवायची. टायर पंक्चरमुळे काढावा लागणारा वेळ वाचणार आहे. त्यामुळे प्रवास करताना पंक्चरची कोणतीही काळजी नसणार आहे. मोठ्या वाहनांना तर याचा सर्वात जास्त फायदा होईल. कारण त्या वाहनातून मोठे अतंर पार केले जाते आणि अनेकदा ट्रक किंवा ट्रोली पंक्चर होतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.