वसंतदादा वसाहतीतील कार्यालयात होणार लर्निंग लायसन्सची चाचणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची माहिती
सांगली : शहरातील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या काही महिन्यांपासून जुना बुधगाव रस्त्यावरील समाज कल्याणच्या कार्यालयाजवळील इमारतीतून सुरू आहे. मात्र अपुरी इमारत तसेच अन्य सोयी-सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी लर्निंग लायसन्सच्या चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्सची चाचणी बुधवार दि. २८ आगस्ट पासून वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील जुन्या कार्यालयात पूर्वीप्रमाणेच घेण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली आहे.
जुना बुधगाव रस्त्यावरील समाज कल्याण कार्यालयाजवळील इमारतीत जुलैपासून आरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणीच लर्निंग लायसन्सची (शिकाऊ अनुज्ञप्ती) चाचणी घेण्यात येत होती. मात्र जुना बुधगाव रस्त्यावरील इमारतीत अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांना चाचणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच अपुऱ्या जागेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या इमारतीतील सुविधा पूर्ण होईपर्यंत लर्निंग लायसन्सच्या चाचणीचे कामकाज वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील कार्यालयात बुधवार दि. २८ ऑगस्टपासून होणार असल्याचेही गाजरे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.