Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक ! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी खेळता खेळता घरात आली अन् नराधमाने.

धक्कादायक ! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी खेळता खेळता घरात आली अन् नराधमाने.
 

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून मुलींसह महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता कल्याण पूर्व आडीवली भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत धर्मेंद्र यादव या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण पूर्व येथील आडवली परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना एका मुलासोबत घरात गेली. मुलगी घरात येताच मुलाच्या वडिलांनी या मुलीला आपल्याजवळ बोलून घेतले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तत्काळ याबाबत मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपास सुरू केला.

नराधमास 7 दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, संशयित आरोपी धर्मेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने धर्मेंद्र यादव याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मेंद्र याने या मुलीसोबत किवा आणखी काही मुलीसोबत असा प्रकार केला आहे का? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.