Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उज्वल निकम भपकेबाज, नौटंकी करणारा; बदलापूर खटल्यातील सरकारी वकीलावर गंभीर आरोप

उज्वल निकम भपकेबाज, नौटंकी करणारा; बदलापूर खटल्यातील सरकारी वकीलावर गंभीर आरोप
 

बदलापूर मध्ये शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर घटनेप्रकरणी एसआयटी नेमल्याचे सांगितले, तसेच उज्ज्वल निकम हा खटला चालवणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. बदलापूरच्या घटनेत उज्ज्वल निकम यांची सरकारने सरकारी वकील म्हणून नेमणूक केल्याने एकनाथ शिंदे सरकारवर टीका होत आहे. उज्ज्वल निकम हा सगळ्यात भपकेबाज वकील आहे. खोट्या बातम्या देऊन स्वतःबद्दल सनसनाटी निर्माण करतो तसेच प्रसिद्धीसाठी नौटंकी करणारा वकील असल्याची टीका होत आहे.

भाजपप्रणित वकिलाकडून न्याय कसा मिळणार? भाजप प्रवक्ते पदी ज्यांची नेमणूक आहे तेच राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून काम कसे करणार? ही नेमणूक चुकीची असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. सामाजिक कार्यकर्ते भैय्या पाटील X पोस्ट वर लिहितात, ” उज्ज्वल निकम हा सगळ्यात भपकेबाज वकील आहे, सरकारने आतापर्यंत अनेक केसेसमध्ये त्याची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. त्यातील 95% केसमध्ये निकम हरले आहेत.
सात वर्षांपूर्वी सिंहगड कॉलेजची विद्यार्थ्यांनी श्रुती डुंबरे आणि सार्थक वाकचौरे यांचा लोणावळ्यात दुहेरी खून झाला. मोठ्या संतापानंतर हा खटला सरकारने निकम यांच्याकडे दिला. या खटल्याचा निकाल लागला, आरोपी निर्दोष सुटले आहेत.

दाभोळकर, पानसरे हत्याकांडात तर त्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले. दलित समाजावरील अत्याचाराच्या अनेक घटनेत ते सरकारी वकील आहेत यापैकी किती निकाली लागल्या ? तर उत्तरच नाही. केसेस सोल्व करायचा उज्वल निकम  याचा रेशो अंत्यत कमी आहे. त्यांच्या आयुष्यात एकमेव 26/11 ची केस त्यांना फेम मिळवून दिली.

तिथे अगदी तालुक्याचा वकील जरी सरकारी वकील म्हणून कोर्टात उभा असता तरी कसाबला शिक्षाच होणार होती. त्या खटल्यात यांचे तेवढेच योगदान जेवढे गाडीखालून चालणाऱ्या कुत्र्याचे गाडी ओढण्यात असते. उलट पत्रकारांना खोट्या बातम्या देऊन स्वतःबद्दल सनसनाटी निर्माण केली, नंतर असं काही झालं नाही हे पण सांगितले. फक्त प्रसिद्धीसाठी नौटंकी करणारा असा हा वकील आहे.
याची वकिली कितपत चांगली आहे हे कधी हायकोर्टाच्या आवारात असलेल्या वकिलांना विचारून पहा….बाकी मुंबईत आलिशान घर असून पंचतारांकित हॉटेल मध्ये हा महाराष्ट्र शासनाच्या पैशातून आलिशान रूम बुक करून वर्ष वर्ष ठेवतो.. याच्यावर शासनाने शेकडो कोटी खर्च केलेत.. आणि रिजल्ट काय तर शून्य.. अशी टीका सामाजिक कार्यकर्ते Bhaiya Patil यांनी केली.

बदलापूर रेल रोको आंदोलन 
 
प्रकरणात तीनशेहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 25 पेक्षा अधिक आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या कारवाई वर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
युवा कार्यकर्ता प्रतीक पाटील X पोस्ट वर लिहितात,

”गृहमंत्र्यांच्या दबावापोटी?!

बदलापूर पोलिसांनी काल आंदोलन करणाऱ्या 300 लोकांवर गुन्हे दाखल केले, अन रात्रीतून 40 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. हे तेच पोलीस आहेत ज्यांनी पीडित चिमुकलीच्या गर्भवती आईला 11 तास पोलीस स्टेशनमध्ये चिमुकली सोबत बसवून ठेवले. हे तेच पोलीस आहेत जे शिंदे गटाच्या नेत्याने महिला पत्रकारावर अश्लाघ्य टीका केली तरी तिची FIR घेईनात, ती पत्रकार काल चार तास पोलीस स्टेशनला असूनही तक्रार घेतली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.