पुणे :- मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
पुणे जिल्हा परिषेदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे तसेच शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष असेलल्या मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुणे येथील बंगल्यांवर मंगळवार (दि.२०) पहाटेच्या सुमारास अचानक सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने छापे टाकले.
दिवसभर सुरु असलेल्या चौकशीने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर काही वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये आयकर विभागाचा छापा पडला होता.
त्यांनतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणात बांदल काही दिवस कारागृहात गेलेले होते. त्यांची जामिनावर मुक्तता झालेली असताना एक वर्षापूर्वी बांदल यांना ईडीचे नोटीस देखील आलेले होते.
दरम्यान, बांदल यांनी वेळोवेळी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावत त्यांची बाजू मांडली होती. मात्र, सकाळी अचानकपणे मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुणे येथील बंगल्यांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला दरम्यान यावेळी कोणालाही कोणतीही कल्पना नसताना अचानक ईडीच्या अधिकाऱ्यांचे छापे पडले. मंगलदास बांदल हे महम्मदवाडी येथील बंगल्यात असून त्यांची पत्नी रेखा बांदल तसेच मंगलदास यांचे दोन भाऊ प्रताप व बापूसाहेब या दोघांची शिक्रापूर येथील बंगल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.याचवेळी शिवाजीराव भोसले बँकेच्या देखील दोन अधिकाऱ्यांच्या घरी ईडीने छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी बांदल यांच्या बँकेच्या लॉकरची देखील पाहणी केली, दिवसभर छाप्यातील चौकशी सुरु आहे. विधानसभेच्या तोंडावर एका राजकीय व्यक्तीच्या घरांवर छापे पडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगलदास बांदल यांना एक वर्षापूर्वी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची नोटीस आल्यानंतर वेळोवेळी आम्ही ईडीच्या कार्यालयात हजर झालेलो आहे. म्हणणे मांडले आहे, मात्र, चौकशी सुरु असताना अचानकपणे ईडीने छापा टाकत कागदपत्रांची चौकशी सुरु केली असल्याचे ॲड. आदित्य सासवडे यांनी सांगितले.
बांदलांच्या वाढदिवसांनंतरच छापे कसे?
मंगलदास बांदल यांचा वाढदिवस दि. १५ ऑगस्ट रोजी होत असताना यापूर्वी देखील १६ ऑगस्ट २०१७ रोजी बांदल यांच्या घरांवर छापे पडलेले आहेत. आज पुन्हा २० ऑगस्ट रोजी ईडीचा छापा पडल्याने बांदल यांच्यावर वाढदिवसांनंतरच छापे कसे पडतात, याची चर्चा बांदल समर्थक करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.