Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कारले नक्कीच खा; परंतु 'या' पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका.

कारले नक्कीच खा; परंतु 'या' पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका.
 

कारल्याचे नाव काढताच बऱ्याच जणांची तोंडे कडू होतात. कारली म्हणजे कडू, हेच उद्गगार कानावर पडतात. परंतु कारले खाण्याचे अनेक गुणवर्धक फायदे आहेत. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी,तांबे, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी आम्ल पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारल्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे कारले खाण्याचे असंख्य फायदे आहेत.

कारले हे चवीला कडूच असते परंतु त्याच्या गुणधर्मांमुळे ते वरदान ठरले आहे. तसेच मुख्य म्हणजे रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे काम करण्यास कारले उपयुक्त ठरते. परंतु कारले सेवन करण्याचे काही विशिष्ट नियम आहेत. कारले काही पदार्थांसोबत खाल्यास काही हरकत नसते. पण काही ठराविक पदार्थांसोबत किंवा काही पदार्थ खाल्यानंतर कारले खाल्ल्यास महागात पडू शकते. कारल्या सोबत किंवा कारले खाल्यानंतर कधीही ते पदार्थ खाऊ नये. जाणून घेऊयात कोणते पदार्थ असे आहेत ज्यांच्यासोबत कारले खाऊ शकत नाही.

कारले खाल्यानंतर किंवा कारल्याचा रस पिल्यानंतर दूध काहीही पिऊ नये. अश्यावेळी दूध पिल्यास पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारले खाल्ल्यानंतर दूध पिल्याने बद्धकोष्ठता आणि पोटात जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

आंबा हा सर्वांचाच अतिशय आवडता असतो. परंतु आंब्यासोबत कारल्याची भाजी किंवा रस पिल्यास उलट्या, मळमळ, ॲसिडिटी, छातीत जळजळ यांसारखे त्रास होऊ शकतात. भेंडीसोबत कारले खाल्याने त्रास होऊ शकतो. हे दोन्ही मिश्रण करून खाल्यास पचण्यास जड जाऊ शकतो.

दही आणि कारले एकत्र खाल्यामुळे त्वचेसंबंधित आजार होऊ शकतात. त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता असते. मुळा आणि कारले यांच्यापासून बनलेले पदार्थ एकत्र खाल्ल्यास पचनक्रियेत बिघाड होतो. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. आम्लपित्त आणि घशात कफ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

दूध 
 
कारले खाल्यानंतर किंवा कारल्याचा रस पिल्यानंतर दूध काहीही पिऊ नये. अश्यावेळी दूध पिल्यास पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारले खाल्ल्यानंतर दूध पिल्याने बद्धकोष्ठता आणि पोटात जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

आंबा 
 
आंबा हा सर्वांचाच अतिशय आवडता असतो. परंतु आंब्यासोबत कारल्याची भाजी किंवा रस पिल्यास उलट्या, मळमळ, ॲसिडिटी, छातीत जळजळ यांसारखे त्रास होऊ शकतात.

भेंडी 
 
भेंडीसोबत कारले खाल्याने त्रास होऊ शकतो. हे दोन्ही मिश्रण करून खाल्यास पचण्यास जड जाऊ शकतो.

दही
 
दही आणि कारले एकत्र खाल्यामुळे त्वचेसंबंधित आजार होऊ शकतात. त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता असते.

मुळा 
 
मुळा आणि कारले यांच्यापासून बनलेले पदार्थ एकत्र खाल्ल्यास पचनक्रियेत बिघाड होतो. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. आम्लपित्त आणि घशात कफ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.