Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलमान खान ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजाराने ग्रस्त

सलमान खान ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजाराने ग्रस्त
 

बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान नेहमी सोशल मिडियामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. सलमान खान ५८ वर्षांचा असून तो फिटनेसच्या बाबतीत तरूणांना देखील मागे टाकतो.

तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतो. पण तो बऱ्याच दिवसांपासून ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराने त्रस्त आहे. पण या आजाराचे लक्षण आणि उपाय कोणते आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजार म्हणजे काय?

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा एक अशा प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या चेहऱ्याच्या नसांमध्ये वेदना होतात. या वेदना खुप असह्य असतात. एवढेच नाही तर या वेदना चेहऱ्याच्या एकाच भागात होतात.

लक्षणे कोणती ?
ट्रायजेमिनल न्यूराल्जियामुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात.

रुग्णाला कानात तीव्र वेदना तसेच ओठांवर वेदना जाणवू शकतात.

चेहऱ्यावर काही सेकंदांसाठी तीव्र वेदना होतात.

या आजारात डोके, कपाळ आणि जबड्यातही वेदना जाणवू शकतात.
शरीरावर कोणता परिणाम होतो?

या आजाराचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो.

या आजारात रुग्णाला नीट बोलता येत नाही किंवा खाता-पिता येत नाही.

रुग्णाला ब्रश करतांना त्रास होतो.

तसेच हसताना किंवा चेहऱ्याला स्पर्श करतानाही रुग्णाला वेदना जाणवू शकतात.

या आजारावर उपचार

या आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णाला सुरुवातीला औषधे दिली जातात. औषधांनी रूग्णाला बरे न वाटल्यास, रुग्णाला कधीकधी ही समस्या हाताळण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन दिले जाते. इतकंच नाही तर कधी-कधी प्रकृती गंभीर असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. ज्याद्वारे या आजारापासून बचाव होऊ शकतो.

सलमानचा आगामी चित्रपट कोणता?

सलमान खान आगामी चित्रपट 'सिकंदर' मध्ये प्रेक्षकांशी भेटायला येणार आहे. या चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवाला आहे. यांनीच किक, जुडवा, आणि मुझे शादी करोगी यांसारखे हीट चित्रपट दिले आहेत. एआर मुरूगादास दिग्दर्शित हा चित्रपट येणाऱ्या ईदला रिलीज होणार आहे. अलीकडेच सलमान खानने सिकंदरच्या सेटवरील एक फोटो शेअर केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आणखीनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.सांगली दर्पण अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.