Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या चिमुरडीवर कट्टरपंथी युवकाकडून बलात्कार

आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या चिमुरडीवर कट्टरपंथी युवकाकडून बलात्कार
 

आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या २ वर्षीय हिंदू चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मोईस नावाच्या कट्टरपंथी युवकाने चिमुरडीवर बलात्कार केल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली.

चिमुरडीवर बलात्कार करून तिला नाल्यात फेकण्यात आले. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी आरोपी मोईसला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रसारमाध्यमानुसार, घडलेली घटना ही मेऱठ येथील बाजार परिसरातील आहे. याभागातील झोपडीत राहणारे हिंदू कुटुंब रात्री बाहेर झोपले होते. याचवेळी २ वर्षांची चिमुरडी आपल्या आईच्या कुशीत गाढ झोपली होती. त्याठिकाणी कट्टरपंथी तरूण मोईस मध्यधुंद नशेत त्याठिकाणी आला. त्यावेळी त्याची नजर चिमुरडीवर पडली. त्यावेळी त्याने त्या चिमुरडीला घेतले आणि तो तिथून निघाला. त्यानंतर हा प्रकार तिथल्या एका मुलाने पाहिला होता. त्याने आरडा ओरडा करायला सुरूवात केली. त्यावेळी कट्टरपंथी युवक पीडितेला घेऊन पळू लागला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याप्रकरणी सांगण्यात आले आहे की, कट्टरपंथी मोईस चिमुरडीला एका नाल्याजवळ घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. चिमुरडी जिवाच्या आकांताने ओरडू लागली. त्यावेळी कट्टरपंथी युवकाने चिमुरडीला नाल्यात फेकून दिले. त्यावेळी त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो सापडला. घडलेली घटना पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी चिमुरडीबाबत विचारले. त्यावर आरोपी २ तास खोटे बोलत होता.
त्यानंतर तब्बल काही तासाने पीडितेचा मृतदेह बाहेर काढला. आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या कलमांसह पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मोईस हा मूळचा बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. मोईसला पोलीस न्यायालयात दाखल करत होते. त्यावेळी त्याने हिंसक वृत्तीने पोलिसांच्या तावडीतून सुटून पळ काढण्याचा मार्ग निवडला. तो भूमसंडी येथे येऊन पोहोचला. त्यानंतर पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याने बंदुक चालवण्याचे धाडस केले. त्यातील एक गोळी ही पोलिस अधिकाऱ्याच्या कानाजवळून गेली असून ते थोडक्यात बचावले गेले. त्यानंतर पोलिसांनी नाविलाजाने गोळीबार केला आणि दोन्ही गोळ्या मोईसच्या गुडघ्याला लागल्या.

मोईस यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतंत्र एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०९ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३/२५/२७ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.