"तु अशी बातमी देतंय. जणू तुझ्यावर बलात्कार झालाय", बदलापूर घटनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचे आक्षेपार्ह विधान
ठाणे : आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, असे सांगत आंदोलकांनी बदलापूर स्टेशनवर ठिय्या दिला आहे. आधी पोलिस आयुक्तांनी समजूत काढली, त्यानंतर मंत्री गिरीश महाजन येऊन गेलेत, परंतु जवळपास सात तासांपेक्षा अधिक काळ आंदोलकांनी स्टेशनवरच ठिय्या दिला आहे.
यातच आता या प्रकरणाला दुसरं वळण लागलं आहे. या घटनेचा वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकाराला शिंदे गटातील नेत्याने आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याने महाविकास आघाडीकडून आता त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडण्यात येत आहे.
एक महिला पत्रकार घटनेबाबत वार्तांकन करण्यासाठी गेली असता. तिच्याबाबत तु अशी बातमी देतंय. जणू तुझ्यावर बलात्कार झालाय अशा प्रकारे टिप्पणी बदलापूरचे माजी नगराध्यक्षा वामन म्हात्रे यांनी केली आहे. वामन म्हात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक असल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टिका केली आहे. पत्रकाराचे काम हे सत्य रिपोर्ट करणे. एका महिला पत्रकार घटनेचे वार्तांकन करायला गेले असतांना त्यांना शिंदे गटाच्या या पदाधिकाऱ्यांने धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.तसेच आमच्या माता भगिनी सुरक्षित आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यावर सकाळपासून काय कारवाई केली? पक्षातून निलंबित केले का? याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार आणि त्यातही महिला पत्रकार बरोबर अर्वाच भाषा वापरणे यातून हे प्रकरण दाबण्याचा किती प्रयत्न झाला हे स्पष्ट आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मतांसाठी योजना आणतात, आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे जवळचे लोक राज्यातील माता बहिणीना अश्या खालच्या भाषेत बोलतात. असे मुख्यमंत्री आणि महायुतीतील सत्ताधारी हे राज्यातील माता भगिनिंचे लाडके भाऊ कधी होऊ शकत नाही. असा हल्लाबोल देखील विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.