Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुकानात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक सांगली एलसीबीची कारवाई

दुकानात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक सांगली एलसीबीची कारवाई
 

शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौक परिसरातील एका दुकानात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यातील एकजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस यैण्याची शक्यता असल्याचे एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सांगितले.

सागर सुरेश चौगुले (वय ३३, रा. इंदिरानगर, सांगली), सुखदेव संगाप्पा कांबळे (वय ४२, रा. हनुमाननगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २५ आगस्ट रोजी शंभर फुटी रस्ता परिसरातील त्रिमूर्ती चौक येथील सुरेश चव्हाण यांच्या दुकानात जबरी चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी यातील संशयित राकृष्ण मंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. यातील सुखदेव कांबळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. दोघांनाही अटक करून विश्रामबाग पौलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुंडे, अजय बेंदरे, रूपेश होळकर, संकेत कानडे, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.