Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरात कोणी नसल्याची संधी साधत विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी.....

घरात कोणी नसल्याची संधी साधत विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी.....
 

बाजोगाई : बदलापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथे एका अल्पवयीन विवाहितेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडितीचे अल्पवयीन वयात लग्न केल्याप्रकरणी तिच्या पतीसह अन्य नातेवाईकांवरही वेगळा गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोलकाता घटनेने संपूर्ण देश हादरून गेलेला असतानाच बदलापूर येथे दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आणि महाराष्ट्र सुन्न झाला. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडालेली असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेल्या एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार केल्याचे उजेडात आले आहे.

घराशेजारी राहणाऱ्याने साधला डाव

19 ऑगस्ट रोजी सदर विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या व तिच्याच भावकीमधील श्रीकांत वसंत मुळे या युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून 23 ऑगस्ट रोजी आरोपी श्रीकांत मुळे याच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे.

पीडिता अल्पवयीन

अल्पवयीन विवाहिता असून, तिचे वय साडेसतरा असे आहे. त्या मुलीचे वयाच्या 13 व्या वर्षीच लग्न झालेले आसल्याचे या घटनेमुळे समोर आल्याने आता पोलीस तिच्यावरील अत्याचारासह तिचे अल्पवयीन वयात लग्न केल्याप्रकरणी तिच्या पतीसह नातेवाईकावर वेगळा गुन्हा दाखल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.