Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तर याला पण कायदेशीरपणे धरून आपटले पाहिजे", बदलापूर घटनेत भाजपच्या 'या' नेत्याचा संबंध

"तर याला पण कायदेशीरपणे धरून आपटले पाहिजे", बदलापूर घटनेत भाजपच्या 'या' नेत्याचा संबंध
 

मुंबई : बदलापूर घटनेचे पडसाद आज संपुर्ण राज्यभरात उमटतांना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू झालं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाकडून आंदोलन सुरू आहे. यातच बदलापूर घटनेत एका भाजप नेत्याचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबंधित भाजप नेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बदलापूर येथील आदर्श शाळेत विद्यार्थींनींवर लैंगीक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावरून काल आंदोलकांनी बदलापूर स्टेशनवर ठिय्या आंदोलन दिलं होतं. यातच ज्या शाळेत ही घटना घडली. त्या आदर्श विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष तुषार आपटे यांनी शाळेतील सीसीटीव्हीचे व्हिडीओ नष्ट करून आरोपीला साथ दिल्याचा एक पोस्टर व्हायरल होत आहे. त्यात त्यांच्या या कृत्याचा आम्ही पालक म्हणून जाहीर निषेध व्यक्त करतो व लवकरात लवकर त्यांनी राजीनामा द्यावा असेही त्यात सांगण्यात आला आहे.

यावरून अंबादास दानवे यांनी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केलीय. हे ट्विट करत अंबादास दानवे म्हणाले की, हे जर खरे असेल तर याला पण कायदेशीरपणे धरून आपटले पाहिजे, यावर कारवाई झाली नाही तर आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल. असा इशाराच त्यांनी महायुती सरकारला दिला आहे.

तसेच तुषार आपटे यांचे काही भाजपच्यासंबंधित पोस्टरही व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे तुषार आपटे हे भाजपचे असल्याने हे प्रकरण दडपण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे का ? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.