लाडकी बहीण :-फॉर्म भरल्यानंतरही खात्यात पैसे आले नाहीत? इथे करा तक्रार
मुंबई : सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत.
तर उर्वरित महिलांच्या अर्जांची सध्या तपासणी सुरू आहे, तर काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे नामंजूर झालेल्या महिलांना अर्ज दुरुस्त करू पाठवल्यास त्या सर्वांना सप्टेंबर महिन्यात थेट 4500 रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, हे पाहा…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाल्यापासून आतापर्यंत राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र जुलै महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांना अद्यापही पहिला हप्ता मिळालेला नाही. कारण काही महिलांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले आहेत. अशा महिलांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे. यासाठी महिलांना नारीशक्ती ऍपवर जाऊन आपल्या अर्जात काही बदल करावे लागणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांना अर्ज करूनसुद्धा खात्यात पैसे आले नाहीत, अशा सर्वांनी नारीशक्ती शक्ती ऍपमधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करून यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करून आपल्याद्वारे सबमिट केलेल्या संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. यात मंजूर, नामंजूर, प्रलंबित, नाकारलेले असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर पाहता येतील. यानंतर नामंजूर असलेल्या सर्व लाभार्थ्यांना अर्ज रद्द होण्याचे कारण पाहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यानंतर नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म संपादित करावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे अर्ज एकदाच दुरुस्त करता येणार आहे. अर्ज नामंजूर झालेल्या महिलांना पुन्हा अर्ज दाखल करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.दरम्यान, आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3 हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत. मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहेत. ही छाननी 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.