Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारुच्या नशेत सांगलीच्या हमालाचा मुडदा पाडला, नेपाळच्या संशयितास मुंबईतून अटक

दारुच्या नशेत सांगलीच्या हमालाचा मुडदा पाडला, नेपाळच्या संशयितास मुंबईतून अटक
 

मडगाव : जुन्या मडगाव रेल्वे स्थानकाजवळ एका हमालाचा खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणातील नेपाळच्या फरार संशयिताला अटक करण्यात आली आहे. मडगाव पोलिसांनी मुंबईतून त्याला अटक केली. मिरज, सांगली येथील हमालाचा त्यांनं धारदार बाटली खूपसून सोमावारी (दि. २६ ऑगस्ट) हत्या केली होती.
 
मडगाव पोलिसांनी सुरेश सिंग सोनार (रा. फोंडा, मूळ नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने मडगाव जुन्या रेल्वेस्थानक परिसरात राजू अशोक कांबळे उर्फ असिफ मोहम्हद नदाफ (३५, मिरज, सांगली महाराष्ट्र) याचा धारदार बाटलीने हल्ला करुन खून केला होता.


संशयित सुरेश सोनार आणि अशोक यांच्यात सोमवारी वाद झाला. वादानंतर दोघांमध्ये झटापटी झाली. सोनारने धारदार बाटली अशोकच्या पोटात खपसन त्याची हत्या केली. पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अशोकचा मृतदेह जुन्या मडगाव रेल्वे स्थानकावर आढळून आला होता. हत्येनंतर संशयित सोनार घटनास्थळावरुन फरार झाला. मडगाव पोलिस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला मुंबईतून अटक करण्यात आलीय.

दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. यावेळी दारुच्या नशेत असणाऱ्या सोनारने हातात असणारी बाटली अशोकच्या डोक्यात फोडली. आणि फुटलेली बाटली त्याच्या पोटात खूपसून त्याचा खून केला. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.