Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईत तरुणींच्या 'गँग'ची दहशत! शाळकरी मुलीला तुडवून तुडवून मारलं

मुंबईत तरुणींच्या 'गँग'ची दहशत! शाळकरी मुलीला तुडवून तुडवून मारलं
 

मुंबई- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ मुंबईच्या वर्सोवातील यारी रोड परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तरुण मुलींची एक टोळी एका शाळकरी मुलीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. कसलीही माणूसकी न दाखवता मुलीला जब्बर मारहाण करण्यात आली आहे. 'फ्री प्रेस जनरल'ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.


दीपिका नारायण भारद्वाज यांनी यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणींची टोळी शाळकरी मुलीला गलिच्छ शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. तिचे केस ओढून लाथा-बुक्क्यांनी तिला मारहाण केली जाते. मुलगी कसंतरी त्यांच्या तावडीतून सुटते आणि आपल्या मित्रांजवळ जाते. पण, तिथे येऊन देखील ही तरुणींची टोळी तिला मारहाण करते.

मारहाणीच्या ठिकाणी अनेकजण उपस्थित असतात, पण कोणीही तिला वाचवण्यासाठी येत नाहीत. तिचे शाळेचे मित्र देखील तिला वाचवायला येत नाहीत. काही मुलं देखील याठिकाणी उपस्थित असतात. भारद्वाज यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, तरुणींच्या गँगकडून शाळेकरी मुलीला यारी रोडवर मारहाण करण्यात आली. त्यांनी मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे.

मुलीला जब्बर मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. असे असले तरी सदर घटना नेमकी कधी घडली याबाबत ठोस पुरावा नाही. तसेच, कोणत्या कारणासाठी मुलींमध्ये मारहाण होते हे देखील कळू शकलेलं नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.